pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबरला शुभारंभ

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.6

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी वर्ष 2023 च्या निधी संकलनाचा शुभारंभ व ध्वजदिन 2022 चे उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या कार्यालयाचा सत्कार तसेच युध्द विधवा, वीरमाता, वीर पिता यांचा सत्कार समारंभ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे गुरुवार दि.7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. तरी जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची राहणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे