श्री गजानन महाराज पालखी मिरवणूकीनिमित्त वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

जालना/प्रतिनिधी,दि. 29
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी पंरपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर आहे. या दिंडीमध्ये 700-800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी ही दि.3 ऑगस्ट 2024 रोजी जालना येथून नाव्हा मार्गे सिंदखेड राजाकडे प्रयाण करणार आहे. तरी पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहे.
श्री गजानन महाराज पालखी मिरवणूकीनिमित्त दि.3 ऑगस्ट 2024 रोजी सध्याचा प्रचलित मार्ग जालना शहरातील अंबड चौफुली-मंठा चौफुली-कन्हैयानगर बायपास जालना-नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपूर- मेहकरकडे जाणारी वाहतूक ही जालना येथील कन्हैयानगर मार्गे देऊळगाव राजा-चिखली- मेहकर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.