तिवसा विधानसभा संघाचे आमदार राजेश वानखडे यांनी आज निंभार्णी ते राजुरवाडी गावाचा घेतला आढावा

मोर्शी/प्रतिनीधी,दि.19
स्थानिक मोर्शी येथे तिवसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशभाऊ वानखडे, यांच्या अध्यक्षतेखाली दि.17 जानेवारी 2025 रोजी आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते ही आढावा मोर्शी तहसील कार्यालय व पंचायत समिती ची संयुक्तीक बैठक मोर्शी तहसील कार्यालयाच्या सभागृहात वेळ 11.00, वाजता यावेळेत संपन्न झाली मोर्शी ग्रामीण भागातील विकासकामांचा आढावा घेतला जाईल, यासोबतच पुढील आर्थीक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या सभेत संपूर्ण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेत नागरिकांना आपल्या समस्यांसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या सभेत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळेल. या आढावा बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्येसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते . अधिक माहितीसाठी आणि सहभाग नोंदणीसाठी भापच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मोर्शी येथील रोजी होणाऱ्या आढावा सभेत विविध शासकीय योजना व विभागांचा समावेश राहणार असून संपूर्ण विभागांचा आणि योजनांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आला आहे.