10 जानेवारीपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव
जालना/प्रतिनिधी,दि.9
महिला व बाल विकास विभागअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडून शासकीय, स्वयंसेवी बालगृहातील व शाळांमधील बालकांसाठी दि.10 ते 12 जानेवारी 2024 कालावधीत दोन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत बालगृहातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दृष्टीने चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलात बुधवार दि.10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी दिली आहे.