शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या शुक्रवारी दुपारी ३ वाजता जालना शहरातील डॉ.फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.या सभेच्या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,माजी नगरसेवक यांची व्यापक बैठक आज बुधवारी सकाळी प्रितीसुधा नगरमधील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,भाऊसाहेब काळे,महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार,राम सावंत,गणेश राऊत,महावीर ढक्का,शेख नबी शिपोरकर,अब्दुल रउफ परसुवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आ.गोरंटयाल पुढे म्हणाले की,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गावपातळीवर आणि शहरातील पदाधिकारी,कार्यकर्ते,नगरसेवकांनी आपापल्या भागात,प्रभागात आवश्यक ते नियोजन करून जास्तीत जास्त मतदार कसे उपस्थीत राहतील या दृष्टीने प्रयत्न करावा असे आवाहनही शेवटी आ.गोरंटयाल यांनी केले आहे.या बैठकीस माजी अब्दुल बासेद कुरेशी,नगरसेवक रमेश गौरक्षक,जीवन सले,विनोद रत्नपारखे,संजय भगत,जगदीश भरतीया,हरीश देवावाले,अशोक भगत,विनोद यादव,वैभव उगले,वाजेद पठाण,शेख शकील,नजीब लोहार,राहुल हिवराळे,अरुण मगरे,आरिफ खान,राधाकिसन दाभाडे,फारुख तुंडीवाले,संगीता पाजगे,चंदाताई भांगडीया,मंगलताई खांडेभराड,किशोर गरदास,भास्कर रत्नपारखे,संतोष माधवले,सुनील भुरेवाल,बालाजी कोताकोंडा,रहीम तांबोळी,शेख शमशोद्दीन,दिलीप मोरे,सुभाषराव शिंदे,सय्यद मुनशी,बद्रीनाथ जाधव,सुभाषराव शिंदे,दत्ता पाटील शिंदे,मनोहर उघडे,दीपक कावळे,गणेश खरात,संतोष देवडे यांच्यासह जालना शहर व विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते,माजी नगरसेवक,सरपंच,उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.