विद्यार्थ्यांचा असाही उपक्रम,शिक्षदिनी निवडले आदर्श शिक्षक

टेंभुर्णी / सुनिल भाले,दि.5
आज 5 सेप्टेंबर शिक्षक दिन संपूर्ण जाफराबाद तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून आज शाळेत अध्यापन केले. व शिक्षक होण्याचा काही काळ सुखद अनुभव घेतला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सेठ एकनाथ भगवानदास काबरा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. वर्षभर आपल्याला अध्यापन करणाऱ्या चांगल्या शिक्षकाचा या दिवशी गुणगौरव व्हावा या करीता इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी स्वतःहुन प्राथमिक विभागातुन प्राथमिक चे शिक्षक शेख गयास यांची तर माध्यमिक विभागतुन शाळेतील सह शिक्षक शेख़ साबेर यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करीत त्यांचा ट्रॉफी देऊन सम्मान केला, विद्यार्थ्यांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रम सद्या टेंभुर्णीच नव्हे तर संपूर्ण जाफराबाद तालुक्यात कुतुहलाचा विषय ठरला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस आर शेख तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षात आदर्श शिक्षक सम्मानाचे मानकरी ठरलेले शिक्षक शेख़ गयास व शेख़ साबेर यांचे अभिनंदन करीत त्यांना सुभेच्छा दिल्या.