pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.20

क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना मार्फत जिल्हयातील गुणवंत क्रीडापट्टू, गुणववंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हयातील 01 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू ( 01 पुरूष, 01 महिला व 01 दिव्यांग खेळाडू ) असे एकुण 04 पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सन 2024-25 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी दि. 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 सदर कालावधीसाठी वर्षाच्या खेळाडूसाठी मागील पाच वर्षाची कामगिरी व क्रीडा मार्गदर्शकासाठी मागील दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल. गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व पाच वर्षापैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. गुणवंत मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्र राज्यात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असले पाहिजे व त्याने पुरस्कार वितरीत करण्यात येणाऱ्या वर्षात वयाची 35 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय मधील राज्य ते राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील. सांघिक अथवा वैयक्तीक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य / जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तीकरित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहिल.
जालना जिल्ह्यातील पात्र असलेल्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी परिपुर्ण अर्ज, सदर पुरस्काराबाबत अर्जाचा नमुना दि.16/10/2017 च्या शासन निर्णयान्वये सदर पुरस्काराचे अर्ज दि. 15 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे पोस्टव्दारे सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे मो. क्र. 7758863991 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे