pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था आयोजित सीएचए आधार चषक क्रिकेट स्पर्धेत अर्णव अँड मोक्ष संघ ठरला विजेता.

क्रिकेट स्पर्धेतून मिळालेली सर्व रक्कम अपघातग्रस्तांसाठी वापरणार.

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 19

न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था ही कस्टम हाऊस एजेंट(CHA )व्यक्तींनी एकत्र येत स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अपघात ग्रस्त व्यक्तींना व अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना मदत करण्यात येते.अपघात ग्रस्त व्यक्तींना व मृत्यू पावलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने व निधी (फंड )गोळा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी उरण तालुक्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यंदाही अक्कादेवी मैदान, मोठी जुई, उरण येथे सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या आधार चषकाचे उदघाटन सोहळा श्री साई देवस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ दादा पाटील,महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारतदादा भोपी,पनवेल दुंदरे ग्रुप ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य विश्वासदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते नारायण माने, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला.

सि.एच.ए. आधार चषक सोहळ्यास तब्बल चारशे पेक्षा जास्त मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.अंबा शिपिंगचे मालक हिरालाल डागा,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे, उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, लायन ग्रुप अध्यक्ष बाळूशेठ फडके,नरेंद्रशेठ मुंबईकर, सूरज म्हात्रे, विनोद भाई म्हात्रे, रुपेश पाटील, सत्यवान भगत श्रीमंत कौशिक ठाकूर,आदर्श शिक्षक दिपक पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश भगत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत रस्ते वाहतूक नियम विषयी माहिती देत सर्वांना रस्ते वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.

या आधार चषक प्रतियोगीतेत खेळण्याकरीता संघटनेतीलच ११ उत्कृष्ट क्रिकेटर सी . एच.ए.बांधव आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे काढून स्वतःच आपली क्रिकेट टीम तयार करून प्रत्येक संघ मालक त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. अश्या प्रकारे या वर्षी १० ( दहा ) टीमच्यां सहभागातून खेळवल्या जाणाऱ्या आधार चषक प्रतियोगीतेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख रक्कम ५०,०००/ ( पन्नास हजार रुपये )आणि ट्राफी तर द्वितीय क्रमांक उपविजेत्या संघास २५,०००/ (पंचवीस हजार रुपये )आणि ट्रॉफी अश्या प्रकारचं बक्षीस दिले जाते.पण यात पण सी. एच. ए. बांधवांच्यां मनाचं मोठेपण दिसून येतोय कारण विजेता आणि उपविजेता संघाचे संघ मालक या बक्षीस रूपातील रक्कमेतुन फक्त आणि फक्त ११ रु. ( अकरा रुपये ) मात्र घेऊन उर्वरित पूर्ण रक्कम हि संघटलेला दान स्वरूपात देऊन आपलं उत्तरदायित्व जपतात.या प्रतियोगितेच्या अंतिम फेरीत अर्णव अँड मोक्ष आणि वेद फायटर्स या संघांनी धडक मारली तर अंतिम अंतिम सामन्यात या प्रतियोगीतेचा विजेता संघ ठरला तो अर्णव अँड मोक्ष हा संघ तर उपविजेता वेद फायटर्स संघ ठरला.या प्रतियोगितेत मालिका वीर या पुरस्काराचा मानकरी ठरला तो २६ चेंडूत १०६ धावा आणि १ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा गोवठणे गावचा अष्टपैलू खेळाडू रोहित पाटील तर उत्कृष्ट फलंदाज ठरला तो गोवठणे गावचा अभिजित गावंड आणि उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराचा मानकरी ठरला तो पिरकोन गावचा प्रशांत गावंड तर उकृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तो सारडे गावचा सुभाष पाटील सोबतच या आदर्शवत कार्यक्रमा करिता गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध समालोचक सुनिल वर्तक यांनी संपूर्ण दिवसभर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित आणि जिवन डाकी यांनीही सुंदर असे निवेदन केले. वेश्वी गावचे माजी सरपंच नरेंद्रशेठ मुंबईकर,महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,कोप्रोली गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेशदादा पाटील,अजित पाटील, सुनिल वर्तक ( अध्यक्ष – गोवठणे विकास मंच ), अनिल घरत( उरण तालुका सचिव – आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था ), वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रदादा पाटील, ग्रामविकास अधिकारी रविंद्र म्हात्रे आणि सर्व सी.एच.ए. बांधवांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.एकंदरीत न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था आयोजित सीएचए आधार चषक क्रिकेट स्पर्धा मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.दरवर्षी पेक्षा यावर्षी या स्पर्धेला सर्वांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष रुपेश भगत यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे