pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कलश इन्टरटमेंट तर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२४ चे धुमधडाक्यात वितरण.

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्लोक पाटील व कल्पना सुर्वे यांच्या संकल्पनेतून त्यांनी साकारलेल्या कलश इन्टरमेंट तर्फे अस्तित्व नारी सन्मान पुरस्कारांचे वितरण मोठ्या धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरे झाले.
उरणमधील सिल्वर ओक ट्रॉपिकल रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मराठी अभिनेत्री व कलाकार भार्गवी चिरमुले, शैलजा घरत, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा भावना घाणेकर व माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या सह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. आलेल्या मान्यवरांवर पुष्पवृष्टी ने स्वागत करून या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
खर तर अस म्हणतात एक महिला दुसऱ्या महिलेचा द्वेष, तिरस्कार करते पण अस नाही तर इथे श्लोक पाटील व कल्पना सुर्वे या दोन महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलेस तीच्या कामाची पोचपावती, तीला प्रोत्साहन व इतर महिलांना त्यांच्या या नेत्रदीपक यशातून प्रेरणा मिळावी, तसेच प्रत्येक महिलेला तीने केलेल्या तीच्या कार्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने तसेच तीच्या तील असलेल्या सुप्त गुणांना एक व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मला आज पहिल्यांदा समजले की “उरण मध्ये इतक्या उद्योजिका आहेत, विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करत आहेत, त्याकरिता कोणतेही वय असावे लागत नाही तर कौतुकाची थाप आणि आपल्याला पाठीवर लढ म्हणणारे असणे हे अत्यंत गरजेचे असते. ” तसेच आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी सन्मानित महिलांना व जमलेल्या महिलांना त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
सन्मान चिन्ह हे मंगल कलशाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. या सन्मान चिन्हाच्या पार्टनर शैलजा घरत या होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण २३ महिलांना या मंगल कलशाचे सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र व एक सुंदर रोपट देऊन गौरवण्यात आले. गौरवण्यात आलेल्या महिलांनीही सोहळ्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले.
कलश इन्टरटमेंट च्या सर्वेसर्वा श्लोक पाटील आणि कल्पना सुर्वे यांनी याविषयी माहिती देत असताना त्या म्हणाल्या ” हा आमचा हा फस्ट सिझन आहे यापुढे आम्ही जास्त कॅटेगरीज घेऊ जास्तीत जास्त क्षेत्रातील महिलांना एक ओळख निर्माण करून देऊ तर फक्त उरणच नाही तर उरण च्या बाहेरच्या महिलांसाठी ही संधी आम्ही देऊ जेणेकरून उरण चे नाव उरण च्या बाहेरही जाऊ दे.” असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्व पत्रकार प्रतिनिधींनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यातआले.कार्यक्रमाच्या वेळी विविध डान्स ग्रुपने आपले सादरीकरण करून वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक शेट्टी यांनी सुंदर भाषाशैलीत केले. तर श्लोक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्लोक पाटील आणि त्यांची कार्यकारी टिमने विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे