यशस्वी जीवना करिता श्री गुरूंची आवश्यकता

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4
मानवाच्या यशस्वी जीवनाकरिता श्री गुरूंची नितांत आवश्यकता असते.
असे असे प्रतिपादन ह भ प नारायण पिंपळे गुरुजी यांनी श्री दत्तात्रेय भगवंत जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या श्रीक्षेत्र खापरखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये केले.
श्री दत्तात्रय भगवंत जनोसोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे त्यामध्ये दिनांक 1/12/2025 रोजी पिंपळे महाराजांची किर्तन रुपी सेवा झाली.
!हेचि भक्ती हेचि ज्ञान, नये वृत्तीवरी मन!
या कीर्तन रुपी सेवेकरिता घेतलेल्या अभंगावर निरूपण करताना महाराज म्हणाले की आजच्या काळामध्ये खरी भक्ती कोणती आहे व खरं ज्ञान कोणतं आहे हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी श्री गुरुंची नितांत आवश्यकता आहे श्री गुरु मिळाल्याशिवाय ते ज्ञान ती भक्ती कोणती श्रेष्ठ आहे ते कळत नाही.
परंतु त्याकरिता श्री गुरु मिळणे अत्यंत दुर्लभ आहे .
दुर्लभम त्रैमेव येत तह देवता नु ग्रह हेतुकम ,मनुष्यत्व मुमुक्षत्व, महापुरुषस संश्रेया.
म्हणजेच या जगामध्ये तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत त्या म्हणजे मनुष्य जन्म दुर्लभ आहे मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि महापुरुष म्हणजे संतांची संगत श्रीगुरुंची संगत अतिशय दुर्लभ आहे.
आपल्या अंतकरणातील मल विक्षेप दोष गेल्याच्या नंतर आवरण दोष घालवण्याकरता श्रीगुरु भेटणे गरजेचे आहे. ते भेटल्यानंतर मानवाचे जीवन निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही .त्यामुळे श्री गुरूंची जीवनात नितांत गरज आहे.
या श्री गुरुदत्त जन्मोत्सव सोहळा आनंदाने यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करणारे सर्व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी गायनाचार्य (झी टॉकीज फेम)ह भ प अनिल महाराज देवडे, ह भ प विष्णु महाराज, ह.भ.प. वैभव महाराज सोनवणे, ह भ प मृदंगाचार्य शंकर महाराज, ह भ प कृष्णा महाराज मोहिते, ह भ प कैलास महाराज, ह भ प माधव महाराज व इतर सर्व गुन्हेजन मंडळी उपस्थित होते.

