pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कारागृह पोलीस भरतीत प्रदीप काळे यांची निवड

0 3 2 6 6 6

जालना/प्रतिनिधी,दि.9

ते म्हणतात ना जीवन जगतांना जीवनात अनेक अडचणी येतात, मात्र त्या अडी-अडचणीवर मात करीत जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास शिखर गाठता येते याचे ताजे उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील नंदापूर येथील युवक प्रदीप रामदास काळे हे होय.
घरात नेहमी गरीबी, वडील दोन्ही डोळ्यांनी अंध, आई पायाने अपंग असल्याने आपल्याला काम करून घर चालवून आई-वडीलांना सांभाळायचे आहे. परंतू हे सर्व करीत असतांना आपल्या जीवनात काही तरी करून दाखवायची जिद्द प्रदीप काळे या युवकाने मनी बाळगत पोलीस भरती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे, नंदापूर गावातच मिळेल ते काम करून आपले स्वप्न पुर्ण करीत मुंंबई कारागृह पोलीस भरतीत त्याने मजल मारली आहे. याकामी त्याला त्याचा भाऊ संदीप काळे यांची मोलाची साथ मिळाली आहे.
मुंबई कारागृह पोलीस भरतीत निवड झाल्याचे समजताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच दत्तु कुरधने, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम खरात, रामकिसन खरात,  एमपीडब्ल्यु श्री नागरे, लिंबाजी शिंदे, जनार्धन काळे, वैभव वानखेडे, सुरेश बार्डे, संजय काळे जनार्धन काळे यांच्यासह अनेकांनी प्रदीप व त्याचे आई-वडील व भाऊ यांचा सत्कार करून पेढे भरवून  शुभेच्छा दिल्या. तर सायंकाळी गावकर्‍यांनी डिजे लावून संपुर्ण गावातून मिरवणुक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे