जवखेडा ठेंग व श्री जनेश्र्वर महादेव मंदिर गोसेवा येथे शिव पंचायतन यज्ञ सोहळा

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.3
दिनांक ०४/०२/२०२६ रोजी शिव पंचायतन यज्ञ सोहळा जवखेडा ठेंग येथे प्रारंभ होत आहे.
हा सोहळा जवखेडा ठेंग येथील जनेश्वर महादेव मंदिर आणि संत जनार्दन स्वामी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वा प्रती वार्षिक शिव पंचायतन यज्ञ सोहळा ४ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे .८ फेब्रुवारी रोजी या कालावधीत संपन्न होणार आहे.
तसेच स्वामी योगी माधवगिरी बाबा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भव्य असा यज्ञ सोहळा पार पडणार आहे. या पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यात दररोज सकाळी ६ वाजता पूजन व विधी पार पडणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.भाविकांसाठी दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तसेच रविवारी सकाळी ११ वाजता यज्ञाची पूर्णाहुती होईल.त्यानंतर दुपारी १२ वाजता योगी माधवगिरी बाबाचे प्रवचन होणार आहे.
जालना जिल्ह्यातील तसेच जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री जनेश्र्वर महादेव मंदिर व गोसेवा आश्रम जवखेडा ठेंग आणि जवखेडा ठेंग गावकरी मंडळीं यांनी केले आहे.

