मोर्शी परिसरात महसुल पथकांनी केली कारवाई रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.4
महसूल विभागाच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले. मंगळवार दि. 3 जून रोजी मध्यरात्री दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांचे धाबे दणाणले आहे. मोर्शी वरूड तालुक्यामध्ये ट्रॅक्टर-टिप्पर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत आहे. दरम्यान मंगळवारी महसूल विभागातील नायब तहसीलदार दिलीप बदकी यांचे पथक वडकी खैरी परिसरामध्ये गस्तीवर होते.त्यांना रात्री ३ वाजताच्या सुमारास खैरी शिवारामध्ये कोसाऱ्याकडून दोन ट्रॅक्टर येताना दिसलें. यावेळी त्यांनी एक ट्रॅक्टर पकडला मात्र दुसरा पळून जात असताना काही अंतरावर दोन किलोमीटरच्या आसपास शेतामध्ये फसला. त्यामुळे तोही ट्रॅक्टर महसूल विभागाला पकडण्यात यश आले. ट्रॅक्टर अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पैकी एक ट्रॅक्टर खैरी येथील हेमंत खंगार यांच्या मालकीचा असून दुसरा ट्रॅक्टर महादापेठ ता. मारेगाव येथील घुंगरुड यांच्या मालकीचा आहे. यांच्यावर महसूल विभागाने कार्यवाही केली. ही कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने पथक प्रमुख नायब तहसीलदार दिलीप बदकी, मंडळ अधिकारी बी. एन. पोटे, तलाठी मोहन सरतापे, सौरभ तुमसकर, दुर्गेश बावनकुळे यांनी पुढाकार घतला. तालुक्यामध्ये अशाच पद्धतीची आणखी ही कार्यवाही होण्याची अपेक्षा वाढली आहे.