विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे होऊन अभ्यास केल्यास यश नक्की…

बदनापूर/प्रतिनिधी, दि.3
बदनापूर :बदनापूर तालुक्यातील राजुरेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता बदनापुर जि जालना येथे आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी मी कसा घडलो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै.भिमराव पाटील डोंगरे आबा यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री पांडुरंग तात्या डोंगरे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री राजकुमार गंगाधर मुंढे साहेब (ARTO) जालना. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजकुमार मुंढे साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मी कसा घडलो हे जर आपल्याला लोकांना सांगायचं असेल तर त्यासाठी ध्येयवेडे होऊन अभ्यास केला पाहिजे तरच यश संपादन होऊ शकते तसेच शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त इतर जनरल नॉलेज,स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले व MPSC,UPSC, परीक्षाद्वारे चांगले यश संपादन करता येते याविषयी मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग तात्या डोंगरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या प्रखड ग्रामीण भाषाशैलीतुन मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाबरोबरच प्रमुख पाहुणे,अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या RTSE स्पर्धा परीक्षेमध्ये बदनापुर तालुक्यातून प्रथम क्रमांक रूपाली राजू मिरासे हिचा प्रथम क्रमांक तर तुषार चव्हाण, अक्षरा एखंडे, श्वेता चव्हाण, तेजश्री पडुळ हे विद्यार्थी पास झाले.तर पाचवी स्कॉलरशिप ज्ञानेश्वरी खडके.NMMS पात्र कोमल कसाब,जयश्री चोपडे तसेच NMMS पास प्राप्ती चव्हाण, साक्षी थेटे, मयुरी खराट या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुणे, अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उदयनाना चव्हाण,गणेशराव चव्हाण,अमोल चव्हाण उपसरपंच,प्रशांत चव्हाण,बाबुराव सोनवणे,रमेश मिराशे, चंपालाल खराट, मदनलाला खडके तसेच पंचक्रोशीतील सर्व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अहिरे सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री प्राचार्य पाटील सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय श्री प्रा.पठाडे सर यांनी दिला.शेवटी बालविवाहविरोधी शपथ घेऊन आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली