pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सामाजिक बांधिलकी जपत पिरकोन फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ चे सदस्यांनी केले विविध समाजकार्य.

0 3 2 1 6 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

असं म्हणतात की आपण केलेलं एक चांगलं कार्य कितीतरी सुखांची अनुभूती देते.सामाजिक बांधिलकी जपत स्वयंप्रेरणेतून आज पर्यंत अनेक समाजकार्य साकारणारा फणसवाडी सेक्टर ११ मैत्री कट्टा मित्र परिवार विविध सामाजिक कार्यासाठी सुपरिचित आहे.उरण तालुक्यातील पिरकोन गावातील सारडे – वशेणी महामार्गावरील फणसवाडी सेक्टर ११ विभागातील मैत्री कट्टा मित्र परिवार ह्या कट्टयावर एकत्र जमणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या होतकरू युवकांच्या माध्यमातून आज एक नाही तर तीन समाजपयोगी कार्य साकारण्यात आली.त्यातलं पहिलं सामाजिक कार्य म्हणजे उरण खारपाडा राष्ट्रीय महामार्ग ८६ या रस्त्यावरील पिरकोन – सारडे दरम्यान वशेणी – सारडे या दिशेकडून पिरकोन कडे येणाऱ्या वाहनांना तिथे असणारा गतिरोधक लगेचच लक्षात येत नसल्याकारणाने भरधाव येणारी वाहने अक्षरशः त्या गतीरोधकावर जोरदार आदळत असतात आणि म्हणूनच भविष्यात ह्या ठिकाणी भयानक अपघात होऊ नये आणि एखाद्या नागरिकाला आपला जीव गमवावा लागू नये या करिता इशारा म्हणून फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ या मित्र परिवाराने आपलं सामाजिक दायित्व जपत स्वतःच्या खिशाला चाट देऊन स्वखर्चाने दिवसा आणि विशेषतः रात्री सुध्दा नजरेत पडावे असे रात्रीच्या काळोखात रेड लाईटने चमकणारे सोलर पॅनल सिग्नल रिफ्लेक्टर बसविण्यात आले.त्याच बरोबर दुसरं आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते म्हणजे नागोठणे येथील बंगालवाडी या दुर – दुर्गम आदिवासी वाडीवरील एका नऊ वर्ष वयाच्या सचिन संदीप वरक ह्या गरीब आदिवासी मुलाचा ( विद्यार्थ्याचा ) खेळतानां
खालीपडून अपघात झाला त्यात त्या मुलाचे दोन्हीं हात जखमी ( फ्रॅक्चर ) झाले होते त्यामुळे त्या मुलाला दवाखान्यातील ऑपरेशनकरिता लागणाऱ्या खर्चाची ऐपत त्या आदिवासीं गरीब आई – बाबांना न परवडणाऱ्या सारखी असल्या मुळे अगदी दोन महिन्या पूर्वीच त्या मुलाच्या वाडीतील रा.जि.प. शाळा बंगालवाडी या शाळेवर नव्याने रुजू झालेले मैत्री कट्टा परिवारातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे शिक्षक सूरज घरत यांनी त्या गरीब आदिवासी आई – बाबांची व्यथा फणसवाडी सेक्टर ११ मैत्री कट्टाच्या मित्र परिवारातील सर्व सदस्यांना सांगितली लगेचच आपलं सामाजिक दायित्व जपत त्या मुलांकरिता सर्वांनी मदतीचे हात पुढे केले.आणि सर्व सदस्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत निधी जमा करून तब्बल १४,०००/ ( चौदा हजार ) रुपयांचा मदत निधी मैत्री कट्ट्यातील सदस्य शिक्षक सूरज घरत यांच्या माध्यमातून त्या गरीब आदिवासी मुलाच्या आई – बाबां कडे सुपूर्द करत एक आदर्शवत कार्य केलं.

सोबतच तिसरं सामाजिक कार्य साकारलं ते म्हणजे पिरकोन – सारडे मार्गावरील सुभाष गावंड यांच्या घराच्या समोरील रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यात खडी मातीचा भराव टाकून मैत्री कट्टयातील सर्व सदस्यांनी श्रमदान करून तो खड्डेमय रस्ता बुजवून त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना, प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्याचे कार्य केले.सामाजिक दायित्व जपणाऱ्या ह्या फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ मित्र परिवारातील सर्व सदस्य मंडळींच्या या विविध कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जातं आहे!.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे