महाशिवरात्री जीवनातील अंधार आणि ज्ञानवर आता करण्याचा दिवस –हरिभक्त पारायण विठू माऊली

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व टेंभुर्णीचे पुरोहित विठू महाराज यांनी असे सांगितले की हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो या आणि याप्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि ज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपास नैतिकता आणि सद्गुणाचे मनन करून साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार शिवलिंग या दिवशी प्रकट झाले होते तेव्हापासून शिवलिंगाला महाशिवरात्रीच्या दिवशी महा अभिषेक पूजन करतात यावेळेस शिवरात्रीला टेंभुर्णी आणि परिसरामध्ये विशेष भक्तीमय वातावरण दिसून आले टेंभुर्णी परिसरात जवळपास 11 महादेवाचे देवालय आहेत पुरोहित विठू महाराज यांनी असे सांगितले की सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वच परिसरातील महादेव नंदी मंदिरामध्ये शंभर ते 110 महा अभिषेक पूजन करण्यात आले यावेळी बरेच मंदिरामध्ये फराळाची विशेष व्यवस्था भाविक भक्तांनी केली होती मोठ्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये शिवरात्री या महासनाचे विशेष महत्त्व दिसून आले भाविकांनी यावेळी प्रार्थना केली की वरून राजाची कृपा आमच्यावर राहू द्या यावेळी महादेव पार्वती यांना प्रार्थना केली की संपूर्ण राष्ट्राचा संरक्षण नैसर्गिक आपत्ती पासून करा सुख समृद्धी भरभराटी सर्व भारतावर राहू द्या बळीराजा सुखी राहू द्या जय भोलेनाथ सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पुरोहित ह भ प विठ्ठल महाराज शेंबेकर टेंभुर्णी



