pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दलपतपुर निंभार्णी घाट बंद झाल्या नंतर अंतोरा घाटातून अवैध वाहतूक सुरुच

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

अमरावती/त्रिफुल ढेवले,दि.31

मोर्शी -: मोर्शी तालुक्यात अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. रेतीमाफियांच्या या दबंगगिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे

रेतीची अवैध वाहतूक जोमात सुरुच
मोर्शी तालुक्यात अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. रेतीमाफियांच्या या दबंगगिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे मनसुबे वाढले असून, ते कुणालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. मात्र, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे
मोर्शी तालुक्यातील अंतोरा रेतीघाटांवरून अनेक दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. रेतीमाफियांच्या या प्रकाराकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रेतीची खुलेआम वाहतूक केली जात आहे. यामुळे यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रेतीची ही अवैध वाहतूक येथून होत असून, रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक कुणाची पर्वा न करता भरधाव वेगात शिवरा मार्गे नेतात. त्यामुळे अपघातांचीही शक्यता नाकारता येत नाही. अंतोरा टप्पा-२ चे काम जोरात सुरू आहे. त्यातच अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तिंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे