pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला राजू मुंबईकर व रोशन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा.

0 3 1 5 3 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर व सामाजिक कार्यकर्ते रोशन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.पनवेल नेरे भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमातील आजी – आजोबांना अन्नदान आणि त्याच सोबत त्या निरागस निर्मल आजी – आजोबांचं मनोरंजन व्हावं म्हणून पप्पू सूर्यराव निर्मित स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या नृत्य कलाकारांच्या नृत्य आविष्कारांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्याच बरोबर या ही वर्षी एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते उरण पाले गावांतील एक गरीब कुटुंबातील साक्षी नावाची दिव्यांग मुलगी ज्या बिचाऱ्या लेकीला आपल्या दुर्धर आजारपणामुळे अंथुरूनावरून उठता बसता सुध्दा येत नाही.त्या लेकीची व्यथा ऐकून लागलीच तिच्या घरी जाऊन तिला वर्षभरा साठी लागणाऱ्या औषधं उपचारा करिता मदत म्हणून तिच्या आई – बाबांच्याकडे आर्थिक मदतीच्या रूपाने रोख रक्कमेचा तब्बल १०,००० रुपयांचा निधी देण्यात आला.त्याच बरोबर चौक खालापूर येथील दरडग्रस्त इर्शालवाडी येथील आदिवासी बांधवांना ज्युस आणि अन्न धान्याचं वाटप करण्यात आले त्याच बरोबर त्या वाडीवरील कोणत्याही मुलीचं लग्न ठरलं तर त्या मुलीच्या लग्नाकरिता तब्बल २०,०००/ ( वीस हजार रुपये ) रोख रक्कम देण्याचा वचन दिलं आणि त्या वाडीवरील शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणा करिता लागणारा पुस्तकं कपड्यांचा खर्च देखील देण्याचे वचनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवण्याचे अभिवचन दिले,तर श्री नाकोडा मुकबधीर विद्यालय सरवली भिवंडी येथील शाळेतील मुलानां आणि चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना गोड जेवणाच्या रूपाने अन्नदान केलं गेलं.तर रानसई येथील भुऱ्याचीवाडी, खैरकाठी, मार्गाची वाडी, खोंड्याची वाडी बंगल्याची वाडी, सागाची वाडी आणि आपटा सारसई येथील बागेचीवाडी, धनगरवाडा, सोनारवाडी, टोकाचीवाडी या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासी बांधवांना डाबर फ्रेश फ्रूट ज्युस व अन्न धान्य वाटप केलं गेले.त्याच सोबत जन्मदिनाच्या उत्तरार्धात श्री साई मंदिर वहाळ येथे खास मनोरंजनात्मक कार्यक्रमात पारंपरिक मंगळागौर फेर नृत्य स्पर्धेचे भव्य असे आयोजन देखील करण्यात आले होते. स्पर्धेत विजेत्या संघाना सात हजार, पाच हजार, तिन हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रत्येक सहभागी संघाना सन्मान चिन्हं देऊन गौरविण्यात आले.सोबतच गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक यांच्या शब्दाला मान देऊन आय लव्ह गोवठणे या गावाच्या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या बोधचिन्हांचा अनावरण सोहळा पार पाडण्यात आला.सोबतच आम्हीं दुरशेतकर आणि आम्हीं गावठाणकर या दोन नामफलकांचा अनावरण सोहळा देखील प्रतीक्षेत आहे.आणि आणखीन एक कार्य आपटा सारसई येथील पाच आदिवासी वाड्यांकरीता बस स्टॉप बांधण्यात आले आहे. आपल्या जन्मदिनाच्या शुभ दिनी रानसई आदिवासीं वाड्यांवरील केळ्याचामाळ आदिवासीं वाडी प्राथमिक शाळा, रानसई वाडी, चिरनेर अक्कादेवी वाडी, वेश्वी वाडी, विंधने वाडी, कोप्रोली वाडी शिवणसई वाडी या आदिवासीं विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा आणि वेश्वी रा.जि.प.शाळा दादरपाडा, रांजणपाडा, जांभूळपाडा, गावठाण,धुतूम, बोरखार,धाकटी जुई,दिघोडे, टाकीगावं,सारडे,पाले,कल्हे, शिवणसई,रिटघर,चिंचवली, दुंदरे या गावांतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वह्या,पेन कंपासपेटी आणि ज्युस, नारळपाणी वाटप करण्यात आले.त्याच सोबत सारडे गावातील गोल्डन ज्युबली मित्र मंडळ संवर्धित कोमनादेवी ऑक्सिजन पार्क या ठिकाणी फ्लेमिंगो,मिकी माऊस यांचे पुतळे आणि चार मंगलकलश बसवून त्या पार्कचा चेहरा- मोहराच बदलून टाकला.आणि हे संपूर्ण पार्क तिसऱ्या डोळ्यांच्या निगरणीत यावे म्हणून राजू मुंबईकर यांनी आपल्या स्वखर्चातून सी.सी.टिव्ही कॅमेरा देखील बसविले आहेत.सोबतच खरोशी गावातील शाळेला एक नवीन टिव्ही संच देखील देण्यात आला.मोठीजुई गावातील बंदरावर जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट खुर्च्या (बेंच ) बसविण्यात आले. वेश्वी गावातील एकविरा देवी मंदिरपायथ्याला रॉक ॲनिमल पार्क येथे प्राण्यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले.श्री साई मंदिर वहाळ येथे मंदिराच्या बगीचामध्ये भव्य असा फायबरच्या बैलाचा पुतळा बसविण्यात आला.ह्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं औचित्य साधत वेश्वी रॉक ॲनिमल पार्क आणि गोल्डन ज्युबली मित्र मंडळ संवर्धित कोमना देवी ऑक्सिजन पार्क येथे वटवृक्षांची लागवड करण्यात आली.वृक्षारोपण करत असताना त्या निसर्गाने सुध्दा ह्या निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्वाच्या कार्यात आपल्या अंतरंगाची उधळण केली. राजू मुंबईकर यांच्या जन्मदिनी ना निमित्त समाजपयोगी कार्य साकरण्या करिता तब्बल पाच दिवस सुध्दा अपुरे पडले. आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा या आदिवासीं बांधवा करिता, गरीब गरजूवंता आणि शालेय विद्यार्थ्या करिता एक आनंदाची पर्वणीच असते.
ह्या प्रेरणादाई अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आणि धुरा सांभाळणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक निवेदक क्षेत्रातील कोहिनूर नितेश पंडित त्यांच्या सोबत सुनिल वर्तक,जिवन डाकी यांनी सांभाळली.ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर उपस्थित होते.जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे, श्री साई देवस्थान साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, दुंदरे ग्राम पंचायतीचे सरपंच सुभाषशेठ भोपी, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारतदादा भोपी, राणीताई मुंबईकर, पप्पूदादा सूर्यराव( डान्स कोरिओग्राफर), विश्वास दादा पाटील( पनवेल तालुका उपाध्यक्ष मनसे), विद्याधरदादा चोरघे( नेरे विभाग अध्यक्ष मनसे), प्रणयदादा भोपी ( पनवेल तालुका खजिनदार आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था ),महादू पाटील ( अध्यक्ष पोलिस पाटील संघटना ),काळूराम पाटील, स्नेहल पालकर ( अध्यक्ष कॉन),श्रीमंत कौशिक ठाकुर ,अनिल घरत ( उरण तालुका सचिव – आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था,संदेश घरत,विठ्ठल ममताबादे ( पत्रकार), नितेश पंडित ( सुप्रसिद्ध निवेदक), सुनिल वर्तक ( सुप्रसिद्ध निवेदक), जिवन डाकी ( सुप्रसिद्ध निवेदक), विलास ठाकूर ( सल्लागार कॉन), अजिंक्य पाटील(सचिव कॉन)सुरेंद्र पाटील ( वेश्वी शाखा उपाध्यक्ष),विनोद पाटील ( सामाजिक कार्यकर्ते वेश्वी ) नितेश मुंबईकर,अरविंद पाटील, श्याम लेंडे, सौ. कडू मॅडम, श्यामकांत पाटील ( उपरपंच सारडे) न्हावा – शेवा सी. एच.ए.संघटनेचे अध्यक्ष रुपेशदादा भगत, दिनेश पाटील, श्याम गावंड, मिलिंद म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, हनुमंत म्हात्रे, समाधान पाटील,हिराचंद म्हात्रे (अध्यक्ष गोल्डन ज्युबली ) शशिकांत म्हात्रे ( मां. सरपंच), नवनीत पाटील, संजीव माळी, माधव म्हात्रे, दिनेश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, संपेश पाटील, क्रांती म्हात्रे, मिलन पाटील,सुभाष पाटील, सचिन पाटील, करुणेश्वर वृद्धाश्रमातील ईश्वरदादा ढोरे, करुणाताई ढोरे आणि सर्व गावांतील प्राथमिक शाळेतील , आदिवासीं वाडीवरील शाळेतील शिक्षक वर्ग,विद्यार्थी वर्ग,आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधव, वृद्धाश्रमातील आजी -आजोबा आणि प्रमुख मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आणि समाजपयोगी कार्याने सजलेला हा अभिष्टचिंतन सोहळा अगदी मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे