महात्मा फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

जालना/प्रतिनिधी, दि.22
घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सचिव श्री आत्मारामजी अण्णा तिडके साहेब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल भैया तिडके सर, पर्यवेक्षक श्री गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील वर्ग 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रयोगाची मांडणी केली. या प्रदर्शनास जि. प. प्राथमिक शाळा पानेवाडी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रयोगाची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील नागरिक, महिलावर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री कारेगावकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री भालेकर सर व श्री शेख सर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री चौधरी सर, श्री मस्के सर, श्री झोरे सर, श्री बेग सर, श्री गोरे सर यांनी परिश्रम घेतले.