ब्रेकिंग
मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

0
3
2
1
6
3
जालना/प्रतिनिधी,दि.4
अंबड येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-1 व 2 अंतर्गत मदतनीस 51 पदे मानधनावर भरली जाणार आहेत. मदतनीस पदासाठी पात्रता, रहिवास, नियम व अटींच्या जाहिरनामासह अर्जाचा नमुना संबंधित महसूली गावच्या ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे. तरी स्थानिक इच्छुक महिला उमेदवारांनी आपले अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती, अंबड येथे मंगळवार दि.24 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अंबड एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एल.नागरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
2
1
6
3