pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा कौशलय विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.7 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 7 जुलै ते 15 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दिव्यांग व्यक्तीसाठी विषेष रोजगार/स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये शासनाच्या विविध विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार/स्वयंरोजगाराच्या विविध क्षेत्रातील संधीबाबत विभागातील/महामंडळातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहून सदर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे