pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गोदाम बांधकामासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0 1 2 0 8 0

जालना/प्रतिनिधी,दि. 2

केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्य सन 2023-24 अंतर्गत स्थानिक पुढाकार बाबीमध्ये जिल्ह्यात कमाल 250 मेट्रिक टन गोदाम बांधकामासाठी भौतिक 3 चा लक्षांक प्राप्त असून प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/ कंपनीFPO/FPC) यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडारान योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदारास अनुदान अनुदेय आहे. सदर बाबीसाठी इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/ कंपनी FPO/FPC) महाराष्ट्र राज्य वखार मह्मंडळच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिजाईन, स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रके आवशयक राहील.
सदर बाबीचा अर्ज/प्रस्ताव माहे सप्टेंबर 2023 अखेर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावेत. गोदाम बांधकाम सन 2023-24 या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहील. तसेच गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारून करावा.
या बाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटाराईज्ड हमी पत्र देणे बंधनकारक आहे. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हातील शेतकरी उत्पादक संघ/ कंपनीFPO/FPC यांनी अधिक माहिती साठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जी. आर. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 8 0