ऑपरेशन सिंदूरचे उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्वागत व जाहिर समर्थन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 8
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने बुधवार दिनांक ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मीर मधील ९ दहशतवादी तळावर क्षेपणाशस्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधील दहशतवादयांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्लाचा कट झाला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाद्याच्या ९ ठिकाणी लक्ष्य केले . या कृत्याचे भारतीयांनी समर्थन केले असून भारताला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. उरण मधील नागरिकांनीही दहशतवाद विरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरण मध्ये पहावयास मिळाले.व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उरणकरांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.या सर्व घडामोडीवर उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट )पक्षा तर्फे भारतीय सैनिकांच्या ऑपरेशन सिंदूरला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.तालुका अध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर यांनी देशाचे कणखर व उत्तम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या निर्णयाचे, कार्याचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत.दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा कोणी भारताकडे वाकडया नजरेने बघणार नाही.भारतीय सेनेने दहशत वाद्यांच्या कृत्यांना जशास तसे उत्तर द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहोत. सर्व भारतीयांनी युद्ध जन्य परिस्थितीत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर यांनी केले आहे.