pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटनेचा पाठिंबा कोणाला ?

आरती बेहरा यांच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष.

0 1 7 4 7 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. भारतासह महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी प्रत्येक जागा साठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी व सत्तेवर यासाठी अनेक राजकीय पक्षांनी एकमेकांशी युती केली आहे.तर अनेक राजकीय पक्षांनी एकमेकांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच ही निवडणूक पारदर्शी, स्वच्छ, भयमुक्त वातावरणात संपन्न व्हावे यासाठी विविध सामाजिक संघटनानीं सुद्धा पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट )यांची महायुती आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ), शिवसेना (उबाटा गट )यांची महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे.सर्वच राजकीय पक्षांना ही निवडणूक स्व बळावर निवडून येणे शक्य नाही. प्रत्येक राजकीय पक्षासाठी ही लोकसभेची निवडणूक महत्वाची असली तरी निवडणुका जिंकणे तितके सोप्पे राहिलेले नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांची मदत घेत आहेत. एकमेकांचे पाठिंबा घेत आहेत. अनेक विविध सामाजिक संघटनेने सुद्धा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करून विविध राजकीय पक्षांना जाहीर पाठिंबा दिला आहे.दिवसेंदिवस राजकारणातील वातावरण तापत चालले असून या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, महिला क्षेत्र आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटना या बाबतीत लवकरच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे.अशी माहिती राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर सोनावणे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटना ही भारत सरकारच्या निती आयोग द्वारा मान्यता प्राप्त महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेली सामाजिक संघटना आहे. महिलांच्या विविध समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्या लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटना आपली राजकीय भूमिका १० एप्रिल २०२४ नंतर मुंबई मध्ये स्पष्ट करणार आहे. राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष आरती बेहरा या १० एप्रिल २०२४ नंतर मुंबई मध्ये येऊन आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटन ही सामाजिक संघटना भारतभर सर्वत्र कार्यरत असून या संघटनेत संपूर्ण भारतात आठ लाख पंच्याहत्तर सदस्य कार्यरत आहेत. ही संघटना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून सदर संघटना कोणत्या राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा देणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

—————————————————————
संघटनेची थोडक्यात ओळख-

महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेची स्थापना २००८ साली झाली. महिला सामाजिक कार्यकर्त्या आरती बेहरा यांनी या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून भारतभर सर्वत्र नेहमी सतत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात. राष्ट्रीय नारीशक्ती महिला संघटना अध्यक्ष आरती बेहरा या महिलांच्या विकासासाठी चोवीस तास काम करित आहेत. भारताचे गुजरात राज्य सोडून सर्व राज्यात महिला विकासाचे काम चालू आहे. सर्व मिळून आठ लाख पंच्याहत्तर हजार जनसंख्या राष्ट्रीय नारिशक्ती महिला संघटनेमध्ये काम करीत आहेत. पुरुष व स्त्री अशा दोन्ही व्यक्ती या संघटनेत कार्यरत आहेत.अनेक तरुणीचे पलायन झाले आहेत. त्या मानवी तस्करी करणाऱ्या लोकांच्या कैदीत अडकलेल्या महिला व युवती यांची सुटका करून त्यांच्या घरी नेणे, विधवा महिलांना पेन्शन मिळवून देणे, महिलांना मारणाऱ्या दारुड्या, नशेडी आणि जुगारी पतीच्या विरोधात आवाज उठविणे. विखुरलेल्या परिवाराला एकत्र (आनंदी) करणे, त्यांना सुधारण्याचे काम संघटनेच्या अध्यक्ष आरती बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आरती बेहरा यांच्या अशा महत्वाच्या योगदानामुळेच सर्व महिलांना त्यांच्या बददल आदरपूर्वक सन्मान आहे.नारी वाचवा देश वाचवा, नारी वाचवा नारीला शिकवा, नारीचा सन्मान करा असे या संघटनेची शिकवण आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे