ब्रह्मर्षी सेवा संस्थेतर्फे मकर संक्राती सण उत्साहात साजरा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
समर्थ,संस्कृत, सविधा, समृद्ध, स्वस्थ,सहयोग असे ब्रीदवाक्य असलेल्या ब्रह्मर्षी सेवा संस्था या सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरात वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. या संस्थेच्या माध्यमातून दिनांक २१/१/२०२४ रोजी श्री साई मंदिर साईनगर वहाळ तालुका पनवेल येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मकर संक्राती(दही चुरा )सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री साई मंदिर साईनगर वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील,सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील, बाळाराम पाटील, मढवी गुरुजी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिबिडी बेलापूर -उत्तम जगदाळे, खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काने ,नवी मुंबई पोलीस आयुक्तालयचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, एस एस डिपार्टमेंट नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अहेर आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती यावेळी लाभले. या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी ब्रह्मर्षी सेवा संस्थेचे अध्यक्ष हरिशंकर शर्मा, उपाध्यक्ष आर एन शर्मा,अनिमेष, महासचिव अरुणकुमार राय, संयुक्त सचिव डॉक्टर अनामिका ठाकूर, कोषाध्यक्ष ओम प्रकाश राय,संयुक्त कोषाध्यक्ष कुमार जनमेजय,कायदेविषयक सल्लागार -अंबरीश चौधरी, कार्यकारी सदस्य नलिन पांडेय,डॉ बरूण कुमार शर्मा (मॅक्सिलोफॅसिअल सर्जन ),मृत्युंजय शर्मा,राजीव रंजनकुमार,अमरेश कुमार,संतोष कुमार,राकेश पांडेय,संजीव कुमार,कबिंद्रनाथ राय, अभिषेक कुमार,गौतम कुमार आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम भगवान परशुरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील,बाळाराम पाटील, मढवी गुरुजींचा सत्कार करण्यात आला. एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सदर कार्यक्रमाचे कौतुक करत रवीशेठ पाटील यांनी ब्रह्मर्षी सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सर्व पदाधिकारी सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्रह्मर्षी सेवा संस्था वर्षभर कोणकोणते उपक्रम राबविते. समाजात या संघटनेचे स्थान काय आहे. याबद्दल विस्तृतपणे माहिती हरिशंकर शर्मा यांनी दिली. तर मकर संक्रातीचा सण साजरा करण्या पाठीमागचा उद्देश याबद्दल आर एन शर्मा यांनी उपस्थितांना माहिती दिली. महिला भगीणींचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.रश्मी कुमारी गौतम तसेच सुशीला देवी यांनी धार्मिक गीते गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. आर. एन.शर्मा यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. एकंदरीत ब्रह्मर्षी सेवा संस्थेतर्फे मकर संक्रातीचा सण श्री साई मंदिर वहाळ येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.