pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून गणेशराव रत्नपारखे यांना वाहिली श्रध्दांजली

0 3 2 1 6 3
जालना/प्रतिनिधी,दि.15
जालना जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे नेते होते, आज ते या जगाचा निरोप घेऊन गेलेत. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. गुरुवार दि. 15 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी गणेशराव रत्नपारखे यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शोक सभेला उपस्थिती लावून आपल्या भावना व्यक्त केल्या.
गणेशीराव रत्नपारखे हा नेता जिल्हाध्यक्ष पद सोडायला तयार नव्हता आणि आम्ही देखील त्यांना सोडायला तयार नव्हतो, त्यांचे पक्षाचे गणीत अत्यंत चांगले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या सारखे इतर कोणतेही नेते दिसत नाहीत, ते आमचे अत्यंत लाडके नेते होते. अशा भावना त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून देखील व्यक्त केल्या. ते कधीच भाषणाच्या लफढ्यात पडत नव्हते, परंतु, जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच धडपड करीत होते. व्यवसाय, कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असतांनाही त्यांनी पक्षाची मोठी जबाबदारी देखील सांभाळली. अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण आणि त्यांची जोडी एकदम चांगली होती. माझ्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे, मात्र गणेशराव रत्नपारखे यांचे मोठे योगदान आहे असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.
शिवाय आपण अजुन 4 वर्ष तरी मंत्री राहणार असून पुढे संधी मिळाली तर अजूनही मंत्री राहील. 9 वर्ष मंत्री राहणे सोपे नाही. मात्र मी आंबेडकरी समाजाचे काम पुढे घेऊन जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर चांगला विश्वास असल्याचेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.
यावेळी रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य संघटक सचिव अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष मिलींद शेळके, मराठवाडा सचिव सुधाकर रत्नपारखे, अ‍ॅड. सिध्दार्थ चव्हाण, सुधाकर शेठ रत्नपारखे, दिलीपराव रत्नपारखे, सुरेश रत्नपारखे, कडूबा शेळके, धनंजय पाईकराव, रावसाहेब उबाळे, विजय खरात, अनिल खिल्लारे, स्वप्नील गायकवाड, सुरेश खरात, नईम बेग, अंकुश चव्हाण, भिमराव इंगळे, गौतम वाघमारे, राहुल रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, अमोल रत्नपारखे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, इतर पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे