pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पाथरवाला खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून सन्मान

0 1 2 0 8 3

शहगड/ तनवीर बागवान,दि.2

अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच सौ.सुमनताई विठ्ठलराव सूडके यांनी प्रतिमा पूजन केले.यावेळी ग्रा.प.सदस्य सखाराम घोडके,संजय ढवळे,योगेश पाचुंदे,ग्रामसेवक काटणकर यांची उपस्थित होते.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच महिला बाल कल्याण विभागाकडून २०२३-२४ चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिनाताई मंजित डोईफोडे,मिनाताई सोपान पाचुंदे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच तथा रोजगार हमी योजना तालुका अध्क्षत घनश्याम भैया हर्षे,भाजपा नेते विठ्ठलराव सुडके,बसपा नेते राहुल ढवळे,किरण हर्षे,तेजस हर्षे,सचिन कर्डिले, बोलेनाथ सुडके,संजय खैरे,परमेश्वर सुडके,दिपक सुडके,दसरथ ढवळे,पांडुरंग घाडगे उपस्थित होते.

यावेळी संजय ढवळे व सुरेश पाचुंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सखाराम घोडके यांनी केले.या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 8 3