pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शहर महानगरपालिकेत महिलांसाठी मदत प्रतीक्षालय कक्ष स्थापन करावा- नगरसेविका सौ संध्या संजय देठे

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी, दि.11

जालना शहरातील सर्व महिला भगिनींसाठी महानगरपालिकेत मदत प्रतीक्षालाय कक्ष स्थापन करण्यात यावा, यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

जालना शहरात महिला भगिनींचे 50 टक्के प्रमाण आहे बऱ्याच परिवारामध्ये पुरुषकर्ता असल्याकारणाने त्यांना व्यवसाय नोकरी करण्यासाठी दिवसभर बाहेर राहावे लागते, म्हणून महिलांनाच महानगरपालिकेत येऊन जन्म मृत्यू नोंद, नामांतर प्रकरण, स्वच्छता घंटागाडी समस्या नळाचेपाणी समस्या निवारण, करण्यासाठी महापालिकेत मदत प्रतिक्षालय कक्ष स्थापन करून त्यामध्ये हिरकणी कक्ष, दक्षता समिती ,पिण्याचे पाण्याची व्यवस्था ,असा स्वतंत्र कक्ष स्थापन केल्यास महिला भगिनींसाठी स्वतंत्र स्वरूपात सुविधा मिळेल व त्यांना कामासाठी प्रतीक्षा करण्याचे काम करणे तर त्या प्रतीक्षालयामध्ये थांबता येईल
महानगरपालिकेत बऱ्याच प्रमाणात दिवसाढवळ्या मद्यपी नागरिकांचा वावर असतो अशा नागरिकाची तपासून करून आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी व मद्यपी नागरिकास येण्यास प्रतिबंध घालावा महापालिकेत उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवावे अशा आशयाचे निवेदन माननीय आयुक्त श्री संतोष खांडेकर यांना देण्यात आले निवेदन देतांना कु शर्मिष्ठा कुलकर्णी ,सौ पुष्पा सुनील मेहेत्रे सौ वैशाली विलास बनसोडे, एडवोकेट सौ उषा राठोड, सौ शारदा काळे, सौ दिपाली बीनीवाले ,उपस्थित होते

——————————————————-
निवेदनावर चर्चा करून जालना शहरातील महिला भगिनींसाठी मदत प्रतीक्षालय कक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करू अशी आश्वासन आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी दिले आहे

——————————————————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे