जालना : विधानसभा निवडणुकीत जनता व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर अपक्ष निवडनुक लढविणारे समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे. शनिवारी महसूल मंत्री तथा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, संजयजी केणेकर, मंत्री अतुल सावे, आमदार विक्रांत पाटील, आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
घनसावंगी विधानसभेतील जनतेचे प्रश्न भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो म्हणून घनसावंगीच्या प्रगतीसाठी आणि विकासात योगदान देण्यासाठी मी पुन्हा भारतीय जनता पार्टीत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सतीश घाटगे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे घनसावंगी विधानसभेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून कार्यकर्त्यामध्ये आनंदानाचे वातावरण पाहायला मिळाले.