pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचा शुभारंभ थाटात संपन्न, अद्रक वॉशिंग मशीन चा उपक्रम राबवणार

0 3 8 6 5 3

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून जवळच असलेल्या जाफराबाद रोडवर गोंधनखेडा शिवारामध्ये, न्यू महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचा शुभारंभ करण्यात आला. या न्यू महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे गफार पठाण फौजी सेट काळेगाव येथील रहिवाशी असून त्यांनी या भागामध्ये, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपला नावलौक मिळवलेला आहे. गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील होताना त्यांनी आपला एक व्यवसाय सुरू करावा हा उद्देश ठेवून न्यू महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी सुरुवात केली. या कंपनीमार्फत त्यांनी अद्रक वॉशिंग मशीन आणून त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच होतकरू तरुण या वर्गांचा विशेष सहभाग होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम पाटील म्हस्के यांच्याबरोबरच, माजी आमदार चंद्रकांत दानवे पाटील यांची आवर्जून उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सर्वच पक्षाचे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. सर्वांनी शुभेच्छा देताना सांगितलं की शेतकऱ्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम असून या उपक्रमाची भरभराट होऊ असे आशीर्वाद सुद्धा अनेकांनी याप्रसंगी दिले. या कार्यक्रमाला पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी स्नेहसंमेलना सारखाच कार्यक्रम आयोजित केल्याचा भास सुद्धा होत होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे