दिव्यांग वृध्द निराधाराची शाखा बैठक वसरणी ता.जी. नांदेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

नांदेड/प्रतिनिधी,दि 19
नांदेड शहरात वसरणी येथे दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्काची माहिती मिळावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत मा.संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचा शाखेतील नागरिकांनी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित संघर्ष केल्याशिवाय न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आपल्या येथे शाखेची स्थापना करुन बोर्ड अनावरण केल्यानंतर आपली संघटितपणे संघर्षात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले.जेष्ठ नागरीक सावंत भाऊराव, गणेशराव गाडे, माधवराव कळसकर, सरदार भगतसिंग,रामसिंग,दत्ता सावंत, नंदकुमार दतभाई,ज्ञानोबा बामनवाड,शंकर जाधव, बालाजी टाक,सोनाजी जाधव, सरस्वती सावंत, गंगाबाई भवाळे, लक्ष्मीबाई टाक,अलका कळसकर,सारीखा, सगुणाबाई जाधव,बामनवाड,चंच