pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

4 ऑगस्ट रोजी शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी बैठक

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि. 2 

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित सन 2023-24 या वर्षाकरीता एकुण 90 खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 90 खेळाच्या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन त्या त्या खेळाच्या अधिकृत जिल्हा संघटनाची तांत्रिक आणि आर्थिक मदत घेऊन पुर्ण करण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जालना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 चे आयोजन व नियोजन करण्यासाठी दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे बैठकीचे आयोजन आलेले आहे.
जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांनी सदर बैठकीस उपस्थित राहून जालना जिल्ह्यामध्ये शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 च्या आयोजन व नियोजनासाठी सहकार्य असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे