जासई हायस्कूलमध्ये कर्करोग उपचार व लसीकरण मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
दिपिशा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी मुंबई कर्करोग उपचार डे केअर सेंटर यांच्या मार्फत एच.पी.व्ही लसीकरण (व्हॅक्सिनेशन) किंवा सर्व्हिकल कॅन्सर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) आणि नियमित तपासणी या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.रयत शिक्षण संस्था श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि .ब .पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे हे शिबीर पार पडले.यावेळी डॉ .दिपाली गोडघाटे (अध्यक्ष दिपिशा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी मुंबई),डॉ.श्रद्धा पाटील -खारकर (उपाध्यक्ष दिपिशा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी मुंबई),निलेश ठाकूर (सदस्य दिपिशा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी मुंबई), ग्रुप ग्रामपंचायत जासई सदस्य कु .आदित्य यशवंत घरत,वीणा घरत , रयत शिक्षण संस्था श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि .बा .पाटील ज्युनिअर कॉलेज जासई प्राचार्य अरुण घाग, सर्व शिक्षक व महिला माता पालक आणि विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्तिथ होते.या शिबिराचे आयोजन मोकाशी मॅडम,बाबर मॅडम, पाटील मॅडम ठाकरे सर, शिंदे सर यांनी केले.