गीता परिवार ट्रस्टच्या वतीने आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गीता भक्ती अमृत संत महोत्सवाचे आयोजन केले आहे. राम जन्मभूमी आयोध्या तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य गीता भक्ती अमृत महोत्सव आणि संत महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी संत भैरवनाथ मंदिर संस्थान, संत नरसिंह सरस्वती संस्था आळंदी, संत खंडोबा देवस्थान आळंदी. देहू येथील गाथा मंदिर संस्थान या महोत्सवामध्ये सहभागी असणार आहे. या महोत्सवासाठी देशातील अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात उच्चतम क्रांती करणार्या सर्व साधुसंत सर्व संप्रदायास आमंत्रित करण्यात आले आहे यामध्ये भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, आचार्य तुषार भोसले, स्वामी रामदेव बाबा, रविशंकर शास्त्री, धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम, साध्वी ऋतुंबरा, आचार्य बाळकृष्ण आणि देशातील प्रतिभावंत साधू संतांना आमंत्रित केले आहे. या महोत्सवामध्ये सुमारे २००० वैदिक द्वारे ८१ कुंडाचा महा याग आणि अकरा हजार विद्यार्थी भगवद्गीता वेद पठण करून देशातील २५० कलाकाराचे माध्यमातून रामायण महानाट्याचे देखील आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, यज्ञयाग ज्ञानेश उपासना, शोभा यात्रेचेही आयोजन आहे विविध क्षेत्रातील लोकांना गीता भक्ती अमृत महोत्सव निमित्ताने एका छता खाली आणण्याचा या अमृत महोत्सवाचा उद्देश असून देशातील विविध संप्रदाय महाराष्ट्रातील साधुसंत वारकरी संप्रदाय यातील प्रसिद्ध कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांना निमंत्रित करून भरीव अशा कार्याच्या आयोजन केले आहे. अशा अलौकिक धार्मिक अध्यात्मिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील महोत्सवासाठी तळणी ता. मंठा येथील भाजपा अध्यात्म आघाडीचे सदस्य तसेच मराठवाडा सहसंयोजक आणि लोकसभा प्रमुख परभणी भगवान सरकटे यांना सेवेची संधी उपलब्ध झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत व कौतुक केले जात आहे.