pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय फेंटबॉल स्पर्धेचे आयोजन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनीधी,दि.26

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जालना जिल्हा फेंटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन देवगिरी इंग्लिश स्कुल, अंबड चौफुली जालना येथे दुसर्‍या जिल्हास्तरीय फेंटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसुन 14, 17 व 20 वर्षाआतील मुले व मुली तसेच 20 वर्षावरील महीला/पुरूष यात सहभागी होऊ शकतील. स्पर्धा सांघीक, दुहेरी, तिहेरी, मिश्र दुहेरी व मिश्र तिहेरी या प्रकारात घेतल्या जातील.
स्पर्धेच्या अधिक माहिती करीता शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366 किंवा मंगेश सोरटी, मारूफ खान, गोवर्धन वाहुळ, संतोष वाघ, अमोल सातपुते, श्रीमती किरण पाटील, युवराज गाडेकर, नितीन जाधव, ऋषी डोंगरे, वेदांत सोरटी, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा.
तरी सदर स्पर्धेत जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडु व शाळा/महाविद्यालयांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, फेंटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खुशालसिंग राणा ठाकुर, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी रेखा परदेसी, देवगिरी इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी, तालुका क्रीडा संयोजक यशवंत कुलकर्णी, फेंटबॉलचे निरीक्षक शेख अहेमद, अ‍ॅड. अमजद पठाण, सचिन आर्य, सोपान शिंदे, राजकुमार दांडगे, विजय गाढेकर, श्रीमती सुनीता गवई, उमेशचंद्र खंदारकर, तुषार गर्जे, राजेभाऊ मगर, सुभाष पारे, नरेश शिंदे आदिंनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे