pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा बाल संरक्षण  कक्ष आणि दामिनी पथकाने पुन्हा रोखला एक बालविवाह

0 1 2 1 1 2

 जालना/प्रतिनिधी,दि.20

चाईल्ड लाईन 1098 कडून मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरामध्ये रॉयल नगर या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह दिनांक 22 मे  2023 रोजी होणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि दामिनी पथकाने घटनास्थळी भेट दिली सदर मुलीच्या वयाचा पुरावा बघितला असता मुलीचे वय हे 15 वर्षे असल्याचे लक्षात आले, यावेळी सदर कुटुंबाचे तसेच मुलीचे समुपदेशन करण्यात आले. तर दुसरीकडे नियोजित वर मुलगा यास  संबंधित ग्रामसेवक तथा प्रतिबंधक अधिकारी यांनी  सदर मुलाची वयाची खात्री केली असता सदर मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असल्याचे निर्देशनात  आले , नियोजित वराला देखील अल्पवयीन   मुलीसोबत बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीची नोटीस ग्रामसेवकामार्फत देण्यात आली .     सदर मुलगी व तिच्या कुटुंबाला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले .सदर कुटुंबाकडून आम्ही आमच्या मुलीची 18 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. सदर कारवाई बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती शालिनी लोखंडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे ,दामिनी पथकाचे सहाय्यक फौजदार रवी जोशी, सहा  पो.उपनिरीक्षक श्री.संजय गवळी ,चाइल्ड लाईनचे संतोष दाभाडे यांनी केली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2