pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गागलेगाव ता.बिलोली येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा नामफलकाचे अनावरण तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळा संपन्न

0 1 7 4 7 5

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.14

गागलेगाव ता. बिलोली येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा नामफलकाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल , शिवाजीराव पांगरगेकर, बालाजी जांबकर, बंडु कदम, आखले, बालाजी माळकौठेकर,कान्होपात्राताई, श्री बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित नामफलकाचे अनावरन, पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा अति ऊत्साहाने झाला.
प्रथम संताच्या प्रतिमेत पुष्पहाराने पुजन वंदन करून दिपप्रज्वलन करण्यात आले
मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
प्रस्ताविक ता.कोषअध्यक्ष धनुरे यांनी केले
पदाधिकारी मेळाव्यात राज्य सचिव व्यंकटराव जाधव, शिवाजीराव पांंगरेकर, चंपतराव डाकोरे, कान्होपात्राताई, इत्यादी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
बिलोली तालुक्यातील सर्व गाव शाखा व तालुकास्तरावर कार्यकत्यांनी बोर्डाचे अनावरण पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्यात नियुक्ती वितरण त्यांचा मानसन्मान करुन धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यमय घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहावर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी विचार विनिमय मेळाव्यात उपस्थित राहाण्याचे ता.अध्यक्ष राजशेखर पाटिल, गंगाधर धनुरे,किरण गुरूजी बडुरकर, ज्ञानेश्वर शिरगिरे, पुंडलिक शिरोळे,,यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे गागलेगाव ,शाखा अध्यक्ष सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे