महेश गिरी महाराज यांची स्वामी विवेकानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
टेंभुर्णी येथील कमी वेळात टेंभुर्णीकरांच्या विश्वास जिंकलेल्या आणि आपल्या चांगल्या आणि प्रामाणिक व्यवहार मुळे टेंभुर्णी येथील लहान व्यापारी यांच्या व्यवसायात त्यांना पिग्मी मार्फत आर्थिक बळ देऊन मोठे केल्या मुळे अल्प कालावधीत प्रसिद्ध झालेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्था ला भेट देऊन समाधान व्यक्त करून गौरी आश्रम मठाचे प्रमुख श्री महेश गिरी महाराज यांनी भेटून समाधान व्यक्त केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद औटी यांनी बाबाजी यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करून आशीर्वाद घेतला. या वेळी यांच्या सोबत गाडेकर मामा शिवाजी वर्गने मधुर काबरा यांच्या सह संस्थेचे संचालक अलकेश सोमाणी, शाम औटी, अविनाश राऊत, योगेश गाडेकर मोरे,यांच्या सह पतसंस्थेचे कर्मचारी ग्राहक उपस्थित होते.