
0
3
2
6
6
6


जालना/प्रतिनिधी,दि.18
बारा वर्षांनी येणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ पर्वासाठी जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वे उपलब्ध करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
प्रयागराज ( उत्तर प्रदेश )येथील कुंभ मेळाव्यात जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत. यात
गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.00 वाजता सुटेल पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वा. सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 04:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वा.पोहोचेल.
गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 07.00 वा. सुटेल आणि जालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक 21 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 आणि दिनांक 29 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07104 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07105 सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर,खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07106 पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील. असे सांगून भाविकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.
————————————————————–
आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे
प्रयागराज येथे महाकुंभ पर्वात कोट्यावधी हिंदू भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य शासनाने काटेकोर नियोजन केले असून देशाच्या विविध भागातील भाविकांना प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. मराठवाड्यातील भाविकांना दि. 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रेल्वे गाड्या टप्प्या- टप्प्याने जाणार आहेत. प्रवासात अडचणी येऊ नये यासाठी रेल्वे विभागातर्फे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास सुखकर होईल. असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांनी व्यक्त केला. तथापि भाविकांनी नियोजन करून सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन भास्करराव पाटील दानवे, रेल्वेचे विभागीय सल्लागार अर्जुन गेही, जालना स्थानक सल्लागार समितीचे प्रा. राजेंद्र भोसले, ममता कोंड्याल, शिवराज जाधव, बाबुराव भवर यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
2
6
6
6