एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमधील प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.5
चिखलदरा, नारवटी, सहस्त्रकुंड आणि बोटोणी येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमधील प्रवेशासाठी दि.25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वर्ष-2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेवून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगरकडे सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज दि.25 जानेवारी 2025 पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावेत, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.