pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री गणेश विसर्जन घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

0 4 0 8 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 27

श्री गणेशोत्सव दि. 19 ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत साजरा करण्यात येत असून दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी श्री विसर्जनाकरीता यावर्षी मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. काही गणेश मंडळ सदर ठिकाणी गर्दी असल्यास घाणेवाडी तलाव येथे विसर्जनाकरीता जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातुन पिण्याचे पाणी जालना शहरात येत असल्याने तेथे श्री गणेश विसर्जनाकरीता गेल्यास गावकरी त्यास विरोध करुन तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान दि. 28 सप्टेंबर 2023 रोजीच्या श्री विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी केशवे नेटके यांनी फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारान्वये घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.
हा आदेश 28 सप्टेंबर 2023 रोजी दिवसभर व दि. 29 सप्टेंबर 2023 रोजीच्या दुपारी 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे