pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सिपोरा अं जिप साठी पक्षाने संधी दिल्यास भारतीय जनता पार्टीचं झेंडा फडकवू

निवडणुक लढण्यासाठी नगरसेवक अनिल बोर्डे इच्छुक

0 3 8 6 5 4

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7

तालुक्यातील सिपोरा अं जिल्हा परिषद सर्कलची जागा अनुसूचित जातीसाठी सुटल्यास जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण तत्पर असून भाजपने मला या जिप सर्कलसाठी उमेदवारी दिली तर जनतेच्या विश्वासावर आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन या जिल्हा परिषद सर्कलचा चा सर्वांगीण विकास करू असे मत नगर सेवक अनिल रामराव बोर्डे यांनी सांगितले .
यावेळी ते म्हणाले की २००५ पासून ते २०१३ पर्यंत जाफ्राबाद येथील तहसील कार्यालय मध्ये सेतू सुविधा च्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या जिप सर्कल मधील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे नाते संबंध आहे तसेच प्रत्येकाच्या सुखा दुखात मी सहभागी असतो तळागाळातील घटकापर्यंत माझ्या नात्यांची नाळ जुळलेली असून मी सर्वांना परीचित आहे तसेच शेतकरी, कामगार, कष्टकरी, वयस्क विद्यार्थी , तसेच महिला यांच्या न्याया हक्कासाठी मी लढत असून माझ्या परीने मी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविलेल्या असल्याने माझ्यावर या सर्कलमधील नागरिकांचा प्रचंड विश्वास असून सिपोरा अं या जिल्हा परिषद सर्कल ची निवडणुक मी लढावी असे या परिसरातील शेतकरी, सर्वसामान्यांची इच्छा आहे .या जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कट्टीबद्ध असल्याने भाजप च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्यावर या सर्कलची जिम्मेदारी द्यावी व मी या जिम्मेदारीचा पुरेपूर फायदा घेऊन वरिष्ठ तथा नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व प्रचंड बहुमताने निवडून येऊन सिपोरा अं या जिल्हा परिषद सर्कलचे विकासाच्या बाबतीत चेहरामोहरा बदलणार असल्याचेही नगर सेवक अनिल बोर्डे म्हणाले .

प्रतिक्रिया

विकासात्मक दृष्टीकोन असलेल्याला संधी द्या
अनिल भाऊ बोर्डे हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे अनेक वर्षांपासून मी त्यांना जवळून पाहिले अनेक लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अनेक कार्यकर्त्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याने ते नक्की विजयी होतील
प्रभाकर पाटील अंभोरे सिपोरा अं.

अनिल बोर्डे यांच्या माध्यमातून
सिपोरा अं सर्कल मध्ये पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी सध्या तरी सर्वात लोकप्रिय चेहरा आहे , सर्वांना सोबत घेऊन काम करायची त्यांची पद्धत आम्ही जवळून पाहिलेली आहे , भाजपा पक्षाने उमेदवारी दिली तर ते नक्की विजयी होतील

सिद्धार्थ भिसे ग्रामपंचायत सदस्य दे.झरी

अनिल भाऊ बोर्डे हे मंगरूळचे रहिवासी असून ते जाफ्राबाद या ठिकाणी सर्व जनतेच्या संपर्कात राहुनं जण सेवा करत आहे आणि पुढे ही करत राहील.
शुभम बोराडे, मंगरूळ.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे