pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.

0 3 8 6 5 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 24

उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी स्कूलअँड जुनिअर कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली,
या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व मुख्याध्यापक (प्रीन्सिपल )उपस्थित होते. त्यांनी विकास कडू यांना बिन विरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले. विकास कडू यांनी आगोदर आर के फाउंडेशन जेएनपीव्ही मध्येहि बऱ्याच वर्षे पालकांचे प्रतिनिधित्व कडून पीटीए उपाध्यक्ष, सेक्रेटरी ह्या पदा वर काम केले आहे. त्यांचा पालक प्रतिनिधी म्हणून वेगळाच ठसा निर्माण झाले आहे.

विकास कडू हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्वांना सुपरिचित आहेत.विकास कडू हे रायगड जिल्हातील नामांकित चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे संस्थापक, अध्यक्ष आहेत त्यांनी जवळ जवळ उरण आणि रायगड जिल्हातील अनेक तालुक्या मध्ये ९ वर्ष समाज सेवेची कामे केली आहेत. त्याची पोचपावती म्हणून त्यांना समाज्याने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.विकास कडू यांची यूईएस उरण येथे पीटीए उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे समजताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.विकास कडू यांच्याशी संवाद साधला असता विकास कडू म्हणाले की मी सर्व यूईएस उरणच्या सर्व शाळेच्या व ज्युनियर कॉलेज च्या पालक प्रतिनिधी व शिक्षकांचे आभारी आहे. की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून बिन विरोध पालक शिक्षक संघ च्या उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केली.त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.आणि मी शाळेसाठी व कॉलेजसाठी, पालकांच्या सेवेसाठी सदैव उभा असेन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे