pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोरड्या दिवशी आदेशाचे उल्लंघन करुन अवैध पध्दतीने मद्य विक्री करणाऱ्या  12 अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई

0 1 7 4 0 7

जालना/प्रतिनिधी,दि.7

कोरड्या दिवशी आदेशाचे व नियमांचे उल्लंघन करुन अवैध पध्दतीने मद्य विक्री करणाऱ्या जालना जिल्हयातील 12 अनुज्ञप्तींचे व्यवहार पुढील आदेश हाईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अंबड तालुक्यातील मौजे-अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणा संदर्भात दि. 25 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत उपोषण सुरु होते, त्यामुळे जालना जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत रहावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि. 31 ऑक्टोबर 2023 ते  दि.2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जालना जिल्हयामध्ये कोरडा दिवस जाहिर करण्यात आला होता. मात्र, काही अनुज्ञप्तीधारक आदेशाचे पालन न करता अवैध पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याबाबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना कार्यालयास माहिती प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी, जालना यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वेगवेगळया ठिकाणी पथके रवाना करण्यात आले. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जालना जिल्हयातील खालील बारा अनुज्ञप्तींचे व्यवहार पुढील आदेश हाईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिले आहेत.
यामध्ये हॉटेल प्रकाश पॅलेस, जालना, हॉटेल मेट्रो, जालना,  हॉटेल कमल, भोकरदन, हॉटेल मातोश्री, परतुर,  हॉटेल ओहम, जालना, हॉटेल रणधीर, जालना,  हॉटेल न्यू इंद्रायणी, जालना,  हॉटेल ब्लू डायमंड, जालना,  हॉटेल सह्याद्री, बदनापुर,  हॉटेल अथर्व, परतुर, हॉटेल समृध्दी, जालना,  हॉटेल मधुबन, भोकरदन यांचा समावेश आहे.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जालना कार्यालयातून राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे संबधीत क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद करण्याबाबत रात्री उशीरापर्यंत कार्यवाही सुरु होती. त्यामुळे जिल्हयात अवैध मद्य विक्री करणा-या अनुज्ञप्तीधारकांचे धाबे दणाणले आहे. यापुढेही अशाच कठोर कारवाई सुरु राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे