pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हज यात्रेकरुंसाठी 17 व 18 मे रोजी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर

0 1 7 3 6 4

जालना/प्रतिनिधी,दि. 9 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज हज यात्रेकरुंना लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीराचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दि. 17 मे 2023 व दि. 18 मे 2023 रोजी सदरील शिबीर सामान्य रुग्णालय, जालना येथे आयोजित करण्यात येणार आहे. शिबीरात जिल्ह्यातील हज यात्रेकरुंनी हजर राहुन लसीकरण व आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता सानप, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी, नायब तहसिलदार विक्रांत मुंढे तसेच स्थानिक हज कमिटी सदस्य वसिम फिरोजलाला तांबोळी,  जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोंदीकर, डॉ. नितिन शहा, वसीम शेख, शहानवाज अहेमद, कल्पना दाभाडे, आर.डी. वसु,तौफिक पठान व रहेनुसार हज कमेटी अध्यक्ष शकील खान, शेख विखार, खादीमिने हुज्जाज हज कमिटी अध्यक्ष अहेमदबीन सईद चाऊस, शेख इमरान उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे