जालना शहरातील बसस्थानकात होणाऱ्या चोरीच्या घटना घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा -सौ संध्या संजय देठे
जालना बस स्थानकातून अंबड बीड लातूर या मार्गे जाणाऱ्या बस रेल्वे स्टेशन येथील बसस्थानक इथून जाऊ द्याव्यात; पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर !

जालना/प्रतिनिधी, दि.13
जालना: मागील काही दिवसापासून मुख्य बस स्थानक ते रेल्वे परिसरात प्रवाशाची प्रचंड गर्दी वाढली आहे ,याच गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर महिला भगिनींचे मोबाईल दागिने लंपास करीत आहेत,
अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून तात्काळ उपाययोजना कराव्यात व बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून, तात्काळ चोरांना पकडून कायदेशीर कारवाई करावी ,
तसेच जालना बस स्थानकातून अंबड बीड लातूर या मार्गे जाणाऱ्या बस रेल्वे स्टेशन येथील बस स्टॅन्ड इथून जाऊ देण्यासाठीच शहर वाहतूक शाखेला आदेश द्यावे जेणेकरून पूर्वीप्रमाणे या मार्गे जाणाऱ्या बसमुळे जुन्या जालन्यातील महिला भगिनी दिव्यांग बांधव अपंग वृद्ध व रेल्वे स्टेशन तील प्रवासी यांची सोय होईल म्हणून पूर्वीप्रमाणे जालना मुख्य स्थानक ते रेल्वे स्टेशन स्थानकावरून वरील बसेस ला जाण्याची परवानगीसाठी द्यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून डॉक्टर अक्षय शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून या विषयी चे निवेदन सौ देठे यांनी दिले आहे,