माध्यमिक शिक्षणाधिकारी हटाव प्रकरणात शिक्षण उप संचालकांनी मागितला अहवाल
शिक्षणाधिकारी हटाव आंदोलनाचा परिणाम !

जालना/प्रतिनिधी,दि 11
दि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना यांच्या दालनात झालेल्या प्रकरणाविषयी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर प्रकाश मुकुंद यांनी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम तसेच त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी काल दि १० मार्च रोजी दुपारी ४ वा बैठक आयोजित केली होती या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना मंगला राजू गायकवाड धुपे यांच्या भ्रष्ट कारभाराविषयी व कार्यालयीन कामाच्या दप्तर दिरंगाई बद्दल आणि पदाधिकाऱ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्यावर खोटे गुन्हा दाखल करणे या विषयी आरोप पत्र ठेवण्यात आले होते येत्या दोन दिवसात त्यांच्याविरुद्ध सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ सतीश सातव यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल व कठोरातील कठोर कारवाई केल्या जाईल त्यासंबंधी अनुपालन अहवाल सादर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना ८ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.* *काय ठेवण्यात आले होते आरोप*? १) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे २) अर्वाच्य भाषा वापरून पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे ३) दीर्घकाळ संचिका प्रलंबित ठेवणे ४) वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे ५) अर्थार्जनासाठी कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे यासोबतच संघाने केलेल्या मागण्यानुसार १)दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत २) वैयक्तिक मान्यतेमध्ये झालेली अनियमित दूर करावी ३) दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी. ४) सन २०२१ पासून च्या भविष्य निर्वाह निधी पावत्या देण्यात याव्यात ५) सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा थकीत पाचवा हप्ता त्याच पद्धतीने (१ला,२ रा,३रा व ४था ) हे थकीत हप्ते कोणत्याही कारणास्तव प्रलंबित असतील तर ते ७ फेब्रुवारी २०२५च्या परिपत्रकानुसार काटेकोरपणे अंमबजावणी करून माहे मार्च २०२५च्या वेतनासोबत देण्यात यावा या १ ते ५ मुद्द्यानुसार अनुपालन अहवाल सादर करण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सदस्य प्रेमदास राठोड , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ उमाकांत राठोड, बामुक्तो चे सरचिटणीस तथा अर्थशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक डॉ मारुती तेगमपुरे , सचिव चंद्रकांत भाई , चव्हाण, ढमढेरे , कदम ,जालना जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमोडे, जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त शिक्षक भगवान पालकर , अन्यायग्रस्त शिक्षिका मोहम्मद शिरीन बेगम शहा, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते