समाज ऐक्यासाठी प्रतिष्ठेची रुढी-परंपरा काळानुसार बदलावी लागेल -समन्वयक आत्माराम ढेकळे

पुणे/प्रतिनिधी,दि.22
समाज मग तो कोणताही असो बदलत्या काळानुसार समाजातील प्रतिष्ठेसाठी असलेल्या कांही रुढी,परंपरेत बदल होणे गरजेचे आहे.असे समाज समन्वयक आत्माराम ढेकळे यांनी नुकत्याच संपन्न केलेल्या मराठवाडा संपर्क दौऱ्यात विविध ठिकाणी संवाद साधतांना व्यक्त केले.
विवाहोत्सुक वधु-वर माहिती संकलन व मराठवाडा ,विदर्भ,खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील संबधितांनी या कार्यात शाखाभेद सोडुन समन्वय साधावा यासाठी प्रामुख्याने या संपर्क दौऱ्याचे आयोजन केले होते.छत्रपती संभाजीनगर,जालना,मंठा,वाटुरफाटा आदी ठिकाणी प्रथम सोनार समाजातील व्यक्तींसी संपर्क करण्यात आला व चर्चा करण्यात आली.ज्याप्रमाणे लग्नकार्यात देणे-घेणे प्रथा प्रतिष्ठा बनली आहे.तर स्वशाखीयांतुन पाहण्याचा दृष्टिकोन …आदी बाबीवर आळा बसणे ही काळाची गरज आहे.सद्य परिस्थितीत तर वधु-वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.शहरी व ग्रामीण भागातुन विवाहोत्सुकांसाठी वधु-वरांच्या शिक्षणाच्या अभाव व प्रभावामुळे सुध्दा मनासारखे स्थळ मिळणेसाठी विलंब होत आहे.त्यामध्ये पुन्हा शाखेंचे बंधन अशा अनेक समस्यामुळे या कार्यात सामाजिक दृष्टीने बदल होणे देखील गरजेचे आहे.यासाठी सर्वांनी या महत्वाच्या बाबीवर विचारमंथन करुन या कार्यासाठी असलेल्या जुन्या रुढी,परंपरा बाजुला ठेवुन मार्ग काढल्यास भावी पिढीला सुखी जीवन जगता येईल.समाजात एकीचे बळ अनेक ज्वलंत समस्यांवर मात करु शकते. प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच युवावर्गांसाठी नौकरी-व्यवसाय उपलब्ध करणेसाठी देखील शासन दरबारी हे एकीचे बळ उपयुक्त ठरणार आहे.अशा अनेक बाबीवर संपर्कात प्रत्यक्षरित्या चर्चा करण्यात आली.