pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्ह्याची “संकल्प ते सिद्धी” उपक्रमाअंतर्गत जिल्हा कार्यशाळा उत्साहात संपन्न

0 3 2 6 0 5

जालना/प्रतिनिधी,दि.8

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त संपूर्ण देशभर “संकल्प ते सिद्धी” अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 08 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्ह्याची विशेष जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्रजी चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या तिघांनीही आपल्या सखोल मार्गदर्शनातून “संकल्प ते सिद्धी” उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा स्पष्ट केली.

कार्यशाळेमध्ये “विकसित भारत – अमृत काळातील सेवा, सुशासन व गरीब कल्याण” या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत, त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले. कार्यशाळेत जिल्हा पातळीवर येत्या काळात पत्रकार परिषद, जनजागृती सभा व मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात आपली जबाबदारी निर्धारीत करत पुढील काळात कार्यरत राहण्याची ग्वाही दिली व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन करण्याचा संकल्प विषद करून कार्यकर्त्यांना तत्पर व सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवाजीबापू थोटे, बद्रीनाथ पठाडे, सुनील आर्दंड, विमलताई आगलावे, विजय कामड, सोपान पेंढारकर, अनिलराव कोलते, सतीश जाधव, चंपालाल भगत, धनराज काबलिये, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव, सखुबाई पणबिसरे, ममता कोंड्याल, वर्षाताई ठाकूर, हिराबाई काळे, सुनील पवार यांच्यासह जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, माजी अध्यक्ष, जिल्हा व मंडळ समिती सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत उपस्थित होते.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे