नांदेड येथे भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळ्यानिमित्त ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.27
नांदेड विष्णुपुरी पासुन जवळच असलेल्या पांगरी ता.नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड,महाराष्ट्र द्वारा गत सहा वर्षांपासून चालु असलेल भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या वर्षी सातव्या वर्षी संकल्पपूर्ती सोहळ्या निमित्त ग्रंथ वितरण सोहळा दि.२८ जुलै २०२४ पांगरी ता.नांदेड येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या वर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला “ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक”(९०३३ ओव्या) हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे. याबाबत यापूर्वी पारायणात बसलेल्या सर्व साधकांना ग्रंथ ज्ञानेश्वरी मोफत वितरण दरवर्षी प्रमाणे करण्यात येते तालुकास्तरीय पदाधिकारी यांनी नविन नावे नोंद केली त्यां साधकांना ग्रंथ वितरण घरपोच करून या सोहळ्यात भाविकांना सहभागी करून घ्यावे त्यांना सुचना द्यावी असे अव्हाहन संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरगेकर यांनी केले.
आपल्या तालुक्यातील जे नवीन व जुने साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत त्यांना खालील प्रमाणे सूचना द्याव्यात..
१) ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही त्यांनाच ज्ञानेश्वरी पारायण प्रत देण्यात येईल..
२) पारायण करावयाचे यावर्षीचे जे वेळापत्रक आहे त्यानुसार पारायण करण्याबाबत कळवावे.
३)९सप्टेंबर २०२४ रोजी मामा मंगल कार्यालय मारतळा येथे सांगता समारंभासाठी यावे लागेल असे साधकांना कळवावे..
४) यावर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला “ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक”(९०३३ ओव्या) हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे. याबाबत यापूर्वी पारायणात बसलेल्या व नव्याने बसलेल्या सर्व साधकांना कळवावे..
५) ज्या नवीन साधकांना यावर्षी पारायण करण्यास बसावयाचे आहे त्यांची नावे दिनांक २५ जुलै २०२४ पर्यंतच पाठवावीत. यानंतर आलेले नावे स्विकारली जाणार नाहीत याबाबत स्पष्टपणे तालुकास्तरावर सर्व पदाधिकारी मंडळींनी साधकांना कळवावे. २५ सप्टेंबर नंतर आलेली नावे स्विकारली जाणार नाहीत.. कारण ऐनवेळी आलेल्या नावामुळे ज्ञानेश्वरी प्रती गोरखपुर वरून मागवणे परत साधकांना पारायण आरंभ करण्यापूर्वी घरापर्यंत पोहोचवणे हे अतिशय कठीण होते..
६) जे नवीन साधक आहेत त्यांना पारायण करण्यासाठी लागणारे ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन जाण्यासाठी सर्व तालुक्यातील निवडक मंडळींनी दिनांक:-२८जुलै २०२४ रोजी पांगरी येथे सकाळी १०ते २ या वेळेमध्ये येऊन ग्रंथ घेऊन जावेत व ५ ऑगस्ट पूर्वी जे आपल्याकडून साधक जोडले गेलेले आहेत त्यांना त्यांच्या घरपोच ग्रंथ नेऊन द्यावा.. ही जबाबदारी सर्वस्वी तालुका स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी मंडळींची असेल..
७) आपल्या गावातील, आपल्या संपर्कातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील जे काही साधक आपल्या परिचयातून यापूर्वी पारायण करण्यास बसलेले आहेत अशा सर्व साधकांना यावर्षीचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे याबाबत कळवावे व यावर्षीचे पारायण वेळापत्रक त्यांच्यापर्यंत व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहोचवावे..व त्यांना यावर्षी पारायण करण्यास बसण्यास आग्रह करावा यापूर्वी ज्यांनी पारायण केलेले आहे त्यांना अतिशय अडचणीच्या कामामुळे पारायण करण्यास बसणे शक्य होत नसल्यास त्यांना त्यांच्या नावावर त्यांच्या परिवारातील कोणत्याही स्त्री, पुरुष ,बालक यापैकी कोणाला तरी पारायण करण्यास बसवा असे आग्रहपूर्वक कळवावे व त्यांना सांगतेच्या दिवशी आवर्जून उपस्थित रहावे याबाबत विनंती करावी.
तरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वितरण सोहळात सहभागी व्हावे असे आव्हान मार्गदर्शक रावसाहेब पाटिल शिराळे,दतराम पा यडके,दतराम पा गोरठेकर, सचिव व्यंकटराव पा जाधव माळकौठेकर सहसचिव प्रभाकरराव पुय्यड,अनिता ताई पतंगे, शिवाजीराव पांगरगेकर, गणेश पवार, शिवाजी मदमवाड, प्रविण महाराज रौतुलवाड, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे पदाधिकारी यांनी केले
असे प्रसिध्दीपत्रक चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले